फलटण प्रतिनिधी- नुकतीच नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आमदारांची साप्ताहिक बैठक देवगिरी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल २८ जानेवारी रोजी पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, इत्यादी मान्यंवर जेष्ठ नेते मंडळी यावेळी उपस्थित होती.

यावेळी बैठकीत प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघातील कामांचा आढावा, समस्या व अडीअडचणींची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. तातडीने त्या कामाची सोडवणूक करण्याचे आदेश संबंधित मंत्र्यांना दिले.
या बैठकीला महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आ.श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर हे प्रामुख्याने मान्यवरांच्या व ज्येष्ठ नेते मंडळींच्या म्हणजे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या शेजारील आसनावर उपस्थित असल्यामुळे विशेष करून सातारा जिल्ह्याच्या व फलटण तालुक्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Back to top button
कॉपी करू नका.