ताज्या घडामोडी
फलटण शहर पोलिस महिलांचे अनोखे रक्षाबंधन: फलटण एस.टी. स्टँड वरील प्रवाशांना बांधल्या राख्या

फलटण प्रतिनिधी- रक्षाबंधन हा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यासाठी खूप खास मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतात.

रक्षाबंधन सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.

या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी फलटण शहर एसटी बस स्थानका मधील विविध प्रवासी तसेच फलटण उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी यांना राखी बांधून हा रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.

यामध्ये यामध्ये प्रामुख्याने फलटण शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, महिला पोलीस हवालदार शिल्पा शेलार, पोलीस शिपाई स्वप्निल खराडे, पांडुरंग धायगुडे, पोलीस कॉन्स्टेबल समीरा शेख यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला.



