ताज्या घडामोडी
ठेकेदाराच्या चुकीमुळे फलटण शहरात धुळीचे साम्राज्य : फलटणकर नागरिक हैरान, संबंधित ठेकेदारांवर कारवाई होणार काय
फलटण नगरपरिषदेचा कारभार "आंधळ तळतय व कुत्र पीठ खातय"

फलटण प्रतिनिधी – फलटण नगर परिषद इमारती समोरील “मालोजी पार्क” या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम सुरू आहे. ठेकेदाराने फाउंडेशन सुरू केले असून फाउंडेशन करणे कामी खोदलेल्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी लागलेले आहे. त्यामुळे त्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणावर राडारोडा एस्क्येलेटरने मशीनच्या सहाय्याने उचलून तो राडारोडा टिपर मध्ये टाकला जात आहे.
टिपर मधून तो राडाराडा फलटण शहरातील मुख्य रस्त्यावरून वाहतूक होत असताना मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर राडाराडा व छोटी छोटी दगडे यांची गळती होत आहे. तो राडाराडा वाळल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य तयार होत असल्यामुळे त्याचा त्रास जनतेला होत आहे. त्याचबरोबर मुख्य रस्त्यावर छोटी छोटी दगडे पडत आहेत या दगडावरून एखाद्याची दुचाकी घसरली तर त्याला यामध्ये जीव सुद्धा गमवावा लागेल याला जबाबदार नगरपरिषद प्रशासन राहणार का तसेच
मालोजी पार्क समोर मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयामध्ये जवळपास ६ ते ७ हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्या विद्यार्थ्यांसह फलटण शहरातील नागरिक अक्षरशा हैरान झाले आहेत.



