फलटण आस्था टाईम्स : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचे आज मोठ्या दिमाखदार सोहळ्यात आळंदी येथून प्रस्थान झाले असले तरी सुद्धा फलटण शहरातील पालखी मार्गावरील रस्त्याची अवस्था बिकटच आहे. मध्यंतरीच्या पावसामुळे शहरातील संपूर्ण पालखी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदर पालखी मार्गा वरील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असणे गरजेचे आहे मात्र तेवढ्या प्रमाणात यंत्रणा कार्यान्वित होताना दिसत नाही.
नुकतीच काही दिवसांपूर्वी आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागरजन यांनी पाहणी करून सूचना देऊन सुद्धा शहरातील पालखी मार्गाची अवस्था बिकटच आहे. यामध्ये असणारा पालखी मार्ग हा बहुतांश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यत्यारित आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी मात्र पाहिजे तेवढ्या प्रमाणात हलवयास तयार नाही.
चौकट :
तत्कालीन प्रांताधिकारी सचिन ढोलेंची उणीव यंदाची वारी अनुभवणार
मागील वर्षी फलटणचे प्रांताधिकारी म्हणून सचिन ढोले हे कार्यरत होते. सचिन ढोले हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी स्वतःला झोकून देऊन काम करणारे कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची संपूर्ण फलटण शहराला ओळख झाली होती. यासोबतच त्यांनी स्वतः काही दिवस पंढरपूर येथे प्रांत अधिकारी म्हणून काम देखील केले होते म्हणून ते स्वतः विठ्ठल भक्त असल्याने त्यांनी पालखी काळामध्ये वारीचे नेटके नियोजन केल्याचे बघायला मिळाले होते. गत काही महिन्यांपूर्वी सचिन ढोले यांची बदली महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी झाली होती त्यानंतर त्यांची पदोन्नतीने मुंबई उपनगर विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली सध्या सचिन ढोले नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) चे सह आयुक्त म्हणून बदली झाली आहे. यंदाच्या वर्षी मात्र सचिन ढोले यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याची उणीव मात्र पालखी सोहळ्यात अनुभवयास मिळत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.