ताज्या घडामोडी

फलटण पंचायत समिती आरोग्य विभागातील श्रीमती नंदा दुर्गे (देशपांडे) सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण पंचायत समितीच्या आरोग्य विभागामध्ये तालुका आरोग्य कार्यालयात ब्लॉक नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत असणाऱ्या श्रीमती नंदा दादाराव दुर्गे (देशपांडे) या नुकत्याच आपल्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या आहेत.

श्रीमती नंदा दादाराव दुर्गे (देशपांडे) या फलटण पंचायत समिती फलटण येथील आरोग्य विभागामधील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात ब्लॉक नर्सिंग ऑफीसर या पदावर कार्यरत होत्या. सातारा जिल्ह्यातील सडेतोड लिखाणासाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय दत्तोपंत देशपांडे यांचे पुत्र विनायक देशपांडे यांच्या त्या पत्नी आहेत.

सेवापूर्ती सोहळयाचा कार्यक्रम फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय लक्ष्मीनगर, फलटण येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमाला फलटण तालुक्यामधील नामांकित व निवृत्त सरकारी मेडिकल ऑफिसर डॉ. कांबळे, डॉ. पोटे, डॉ. भोईटे, डॉ. एरंडे, डॉ. सोनवलकर मॅडम, डॉ. रसाळ 

फलटण नगर परिषदेच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ‌. वैशाली चोरमले, सातारा जिल्हा ॲम्युचर खो – खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीनभैया भोसले

प्रसिद्ध बागायतदार विराज बेडके, फलटण तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महेंद्र बेडके, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भरत बेडके,ॲड. सचिन शिंदे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भोईटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉक्टर कांबळे डॉक्टर पोटे डॉक्टर भोईटे, श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर दादासाहेब चोरमले यांनी आपल्या भाषणामध्ये नंदा दुर्गे (देशपांडे) यांनी आरोग्य विभागात बजावलेल्या प्रामाणिक सेवेबद्दल त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक केले.


यावेळी नंदा दुर्गे देशपांडे यांचा विविध मान्यवरांनी सत्कार केला. कार्यक्रमास राजकीज, सामाजिक शैक्षणिक, पत्रकारिता, आरोग्य विभागातील फलटण शहरातील खाजगी वैद्यकिय व्यवसायिक

आरोग्य कर्मचारी लक्ष्मीनगर मधील प्रतिष्ठित व्यापारी वर्ग व ओंकार गणेशोत्सव मंडळ लक्ष्मीनगर येथील कार्यकर्ते उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन अमोल पवार यांनी कले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.