फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला असून दिवाळीनंतर या निवडणुका तात्काळ घेण्यात येतील अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्ही.व्ही.पॅट मशीन लावणार नाही व सध्या व्हीव्हीपॅट मशीन निवडणूक आयोगाकडे उपलब्ध देखील नाहीत असे निवडणूक आयुक्त वाघमारे म्हणाले आहेत.
एखाद्या व्यक्तीने मत नोंदविल्यानंतर ते मत ज्या चिन्हावर ला दिले आहे त्या चिन्हाची चिट्कोटी व्ही.व्ही.पॅटमधून बाहेर पडते. निवडणूक आयोगाच्या या व्ही.व्ही.पॅट मशीन न वापरण्याच्या भूमिकेला महाविकास आघाडीने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने या व्ही.व्ही.पॅट मशीन न वापरण्याच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात दाद मागितली जाईल असे प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगितले आहे. शिवसेनेच्या वतीने सुषमा अंधारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात असे मत व्यक्त केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.