फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा : गोळीबार मैदान फलटण येथील फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल अशोकराव निंबाळकर यांच्या गोळीबार मैदानावरील राहत्या घरी सायंकाळी ६.४५ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान घराचे मुख्य दरवाजाचा कडीचा कोयंडा चोरट्याने तोडुन, घरात प्रवेश करुन, घरातील ७ लाख १६ हजार ३०३ रुपये किमतीचा रोख रक्कम व सोने ऐवज चोरीला गेला आहे.
चोरीस गेला माल ४ लाख रुपये रोख रक्कम ५१५५० रुपये किमतीची १० ग्रॅम ६४९ मिली वजनाची सोन्याची चैन,७ हजार चारशे चाळीस रुपये किमतीची १ ग्रॅम ५९० मिली वजनाची सोन्याच्या मंगळसुत्रामधील मराठी वाटी, हजार २२३६५ रुपये किमतीची ४ ग्रॅम ४२० मिली वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, एक लाख 73 हजार ७८६ रुपये किंमतीची ३४ ग्रॅम ५५० मिली वजनाचा सोन्याचा टेंम्पल हार, ४४५१५ रुपये किमतीची ८ ग्रॅम ८५० मिली वजनाचे सोन्याचे टेंम्पल झुबे, १६ हजार ३४७ रुपये किमतीची ३ ग्रॅम २५० मिली वजनाचा सोन्याचा हार असा एकूण ७ लाख 16 हजार तीनशे तीन रुपये मुद्देमात चोरीस गेला आहे. अशी फिर्याद राहुल अशोकराव निंबाळकर यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधी दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गगुरनं व कलम :- 265/2025 B.N.S., कलम 305(a), 331(4) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.
सदरच्या गुन्ह्याचा तपास फलटण शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे करीत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.