ताज्या घडामोडी

गुरव समाजाच्या वतीने श्रावणी व यज्ञोपवीत (जानवी ) पूजन सोहळा शनिवार दि.९रोजी जावली ता.फलटण येथे आयोजन

(जावली/अजिंक्य आढाव)- सातारा, फलटण, खंडाळा तालुका गुरव समाज संघटनेचे च्या वतीने शनिवारी दि.९ ऑगस्ट २०२५ रोजी जावली ता. फलटण येथे सकाळी १० ते ५ यावेळेत संपन्न होणार असून सर्व गुरव समाजातील बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुनिल बबन गुरव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी सकाळी ७ ते १० श्रावणी सोहळा, १० ते १२ जानवे बदलणे ,आरती व नैवेद्य १ ते ३ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या बरोबरच कार्यक्रमासाठी गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भांडवलकर, हणमंत गुरव उपाध्यक्ष, विद्याधर पुजारी – सचिव फलटण तालुका,सागर गुरव अध्यक्ष खंडाळा तालुका, दत्तात्रय शिर्के उपाध्यक्ष- खंडाळा तालुका, विशाल दळवी-सचिव सर्व कार्यकारी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित राहणार असुन गुरव समाजातील बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.