फलटण प्रतिनिधी- निरगुडी ता.फलटण येथील महात्मा फुले नगर येथे भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त गेली 14 वर्षे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यामध्ये प्रामुख्याने विविध क्रीडा स्पर्धा, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.
या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. पहिले व्याख्यान लेखक व कवी तानाजी जगताप यांचे झाले. त्यांनी समाज शिकला पाहिजे. समाज शिकला तरच समाजामध्ये परिवर्तन घडेल होतो आपल्या पायावर सक्षमपणे उभा राहील कारण सध्याचे हे स्पर्धात्मक युग आहे या स्पर्धेमध्ये टिकावयाचे असेल तर मुलांच्या मध्ये जिद्द चिकाटी सातत्य व संघर्ष करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे यासाठी पालकांनीसुध्दा मुलांकडे लक्ष दिले पाहिजे व योग्य वयात त्यांच्यावर चांगले संस्कार करून तसेच मैदानावरील खेळाला प्राधान्य देऊन त्यांची जडणघडण करणे महत्त्वाचे असल्याचे जगताप यांनी शेवटी सांगितले.
प्रारंभी मंडळाच्या वतीने तानाजी जगताप यांचे स्वागत व सत्कार मंडळाचे अध्यक्ष निलकुमार गोरे, उपाध्यक्ष सुनिल गोरे,मा.अध्यक्ष तानाजी गोरे यांच्या हस्ते केला.
कार्यक्रमाची प्रास्ताविक महेंद्र गोरे यांनी केले. याप्रसंगी रणजित गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार पत्रकार सुरज गोरे यांनी मानले.
यावेळी मा.अध्यक्ष लहु गोरे, देवराज गोरे, अनिल गोरे, अजित किसन गोरे, भिकाजी गोरे, संदीप गोरे,शंभूराज गोरे, अक्षय आवटे, अजित रोहिदास गोरे, प्रविण गोरे , सागर गोरे, अमोल नारायण गोरे, शंतनु गोरे, अमित आवटे, दयानंद आवटे, विशाल गोरे, गणेश बिटू गोरे, बारिकराव गोरे, जगन्नाथ गोरे,
महिला वर्ग व महात्मा फुले नगर मधील सर्व समाज बांधव उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.