मुंबई प्रतिनिधी- मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित असून या दोन्ही समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ५ किंवा ६ नोव्हेंबरला भेट मागितली आहे.
या संदर्भात शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपती यांना एक पत्र पाठवून मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्या संदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची या पत्रामध्ये मागणी केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, खासदार प्रियंका चतुर्वेदी, खासदार राजन विचारे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार संजय जाधव, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील प्रभू इत्यादी मान्यवरांचे शिष्टमंडळ लवकरच राष्ट्रपतीं यांची भेट घेणार आहेत.
तसेच वेळ पडल्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील भेटणार आहेत व या दोन्ही समाजाला आरक्षण देण्यास संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत.
Back to top button
कॉपी करू नका.