फलटण : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चालु असलेल्या साखळी व बेमुदत आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांच्या भावनांचा आदर करून आम्ही सार्वजनिक व राजकीय कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेत आहोत अशी माहिती महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री संजीवराजे ना. निंबाळकर यांनी कळविले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण चालू आहे. त्यांची तब्येत सध्या खालावली आहे. त्यांना पाठिंबा म्हणून संपूर्ण राज्यभर साखळी व आमरण उपोषण चालू आहे.
या पार्श्वभूमीवर कोणताही राजकीय कार्यक्रम घेणार येणार नसल्याचा कळविण्यात आले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.