ताज्या घडामोडी

आता नाही माघार यंदा संजीवराजेच खासदार; फलटणला राजेगटाचा मेळावा; महायुतीत सामील झाल्याने कोणाचेही फोटो नाहीत

फलटण- (चैतन्य दिलीप रुद्रभटे)यंदा बाबाच खासदार होतील, असे म्हणत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी माढा लोकसभा मतदार संघात शड्डयू ठोकला आहे. गुरुवार (दि. १) रोजी अनंत मंगल कार्यालयात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जाहीर मेळावा संपन्न झाला. यावेळी माण, खटाव, माळशीरस, कोरेगाव आणि फलटण तालुक्यातील सर्वच राजेगटाच्या कार्यकर्त्यांनी श्रीमंत संजीवराजे यांच्या उमेदवारीची मागणी केली. यावर श्रीमंत रामराजे यांनी देखील यंदाच्या निवडणुकीत काहीही झालं तरी लढायचच, असा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला. सोबतच आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर विरोधक असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देखील उमेदवारी मिळून द्यायची नाही, असा निश्चय यावेळी केला.

दरम्यान, या मेळाव्याची जाहिरात करत असताना बॅनरवर कोणत्याही नेत्यांचे फोटो लावले नव्हते. यामुळे विविध प्रसार माध्यमात याची चर्चा झाली, असे म्हणत आपल्या मनोगताच्या सुरुवातीलाच श्रीमंत रामराजे यांनी श्री. रुद्रभटे यांनी केलेले लिखाण म्हणजेच अजित पवारांवर नाराज असल्याची शक्यता ही अर्थहीन आहे, असे सांगितले व अपक्ष लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. आपण सध्या महायुतीचा भाग आहोत. महायुतीत भाजप हा देखील पक्ष आहे. नेत्यांचे फोटो लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरुन भाजपच्या खासदारांवर टीका करणे योग्य ठरले नसते. म्हणून मेळाव्याच्या बॅनरवर कोणाचे फोटो लावले नाहीत, असे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.