ताज्या घडामोडी

विमलाबाई नेर्लेकर माध्यमिक विद्यालयामध्ये संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडीचे आयोजन

पुणे प्रतिनिधी- भगीरथ एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट पुणे द्वारा संचलित सौ विमलाबाई नेर्लेकर माध्यमिक विद्यालय रामनगर खडकवाडी येथे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.


शेकडो वर्षांपूर्वी सुरू झालेली संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत सोपान काका महाराज, संत निवृत्ती महाराज, श्री. संत जनाबाई महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालखी सोहळ्याची परंपरा व त्यामधील असणारे रीती रिवाज विद्यालयातील मुलांना माहित व्हावेत या उद्देशाने आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्याची सुरुवात भगीरथ एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टचे संचालक यशवंत तागुंदे, खडकवाडी ग्रामपंचायतचे सरपंच यांच्या शुभहस्ते या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.


या पालखी सोहळ्यामध्ये विद्यालयातील सर्व मुले -मुली नटून-थटून आली होती. यामधील काही मुलांनी श्री. विठ्ठल- रुक्मिणी यांचा वेश परिधान केला होता तर काही मुलांनी वारकऱ्यांच्या वेषात गळ्यात टाळ मृदुंग व ढोलकीच्या निनादात हा सोहळा रंगला होता.


विशेष करून या सोहळ्यामध्ये भगीरथ एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रेय पायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


या सोहळ्यामध्ये अनेकांनी फुगड्या खेळून व अभंग म्हणून आपला आनंद द्विगुणीत केला गावामध्ये ठीक ठिकाणी या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात येत होते.


पालखी सोहळ्याचा समारोप विद्यालयाच्या आवारामध्ये संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पायगुडे यांच्या शुभहस्ते आरती करून संपन्न झाला.


भगीरथ एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टचे सचिव रवींद्र नेर्लेकर, संचालक लक्ष्मण माताळे व विद्यालयाच्या प्रशासन अधिकारी दुधनकर मॅडम यांचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले.

या सोहळ्यामध्ये प्रामुख्याने माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत पवार, यांच्यासह सुरेश थोरात सर, नवनाथ डिंबळे सर, श्रीराम सरपाले सर. श्री संजय जगताप सर, मच्छिंद्र घणकुटे सर, सौ. सारिका घारे जगताप मॅडम सौ. रोशनी जगताप मॅडम, सौ मंगल देवकाते मॅडम, सौ. सुनंदा हजारे मॅडम, तागुंदे महाराज, अनिल देशमुख, एकनाथ जाधव, बाळू रायकर यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ विद्यार्थीनी मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.