फलटण प्रतिनिधी आस्था टाईम्स- सकल हिंदू समाज कृती समिती फलटण तालुक्याच्या वतीने
जम्मू काश्मीर राज्यातील पहेलगाम येथील हिंदू पर्यटकांवरील भ्याड हल्याचा जाहीर निषेध व्यक्त करणारे निवेदन प्रांताधिकारी फलटण यांना देण्यात आले असून केंद्र शासनाला आमच्या भावना कळविण्याची विनंती करण्यात आली आहे.
सकल हिंदू समाज कृती समितीच्यावतीने तयार करण्यात आलेले सदर निवेदन हिंदू समाजातील स्त्री – पुरुष आणि मुलांनी एकत्रित अधिकार गृह इमारती मधील तहसील कार्यालयात जाऊन दिले. निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी सदर निवेदन स्वीकारले.
जम्मू काश्मीर राज्यातील पहेलगाम येथील हिंदूंवरील भ्याड हल्याचा जाहीर निषेध या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
भारतीय संघराज्यातील एक राज्य असलेल्या जम्मू काश्मीर मधील पहेलगाम भागामध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करुन त्यांना ठार मारले आहे, निषेध करताना त्यामध्ये अतिरेक्यांनी
नाव आणि धर्म विचारुन, हिंदू असल्याची खात्री करुन त्यांचे कपडे काढून, त्यांची निघृण हत्या केल्याचे निदर्शनास आणून देत, वास्तविक पाहता संपूर्ण भारतात अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असताना जम्मू – काश्मीर भागात झालेल्या गोष्टीची निषेध करीत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
अतिरेक्यांना कोणताच धर्म नसतो असे सांगणाऱ्या सर्वांनी हे लक्षात घ्यावे की धर्म विचारुन हिंदू असलेल्या पर्यटकांचीच हत्या करण्यात आली असल्याचे नमूद करीत
अतिरेकी पुन्हा त्यांच्या जुन्या आणि घाणेरड्या संस्कारावर येऊन हिंदूंची हत्या करत आहेत, ३३ पेक्षा जास्त हिंदूंची हत्या झाली असून, अनेक पर्यटक जखमी झाले आहेत याचाही निषेध करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
प्रांताधिकारी फलटण यांना दिलेल्या या निवेदनात आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन आमच्या निषेधाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची विनंती प्रांताधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
Back to top button
कॉपी करू नका.