फलटण प्रतिनिधी- इको सर्क्युलर इंडिया फाउंडेशन, कमिंस इंडिया फाउंडेशन, मुधोजी कॉलेज फलटण, नगरपरिषद फलटण फलटण, वन विभाग आणि ग्लोबल अलायन्स फॉर इनसिनरेशन अल्टरनेटिव्हज यांच्या संयुक्त विद्यमाने फलटणमध्ये १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये “आंतरराष्ट्रीय शून्य कचरा महिना” या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कमिन्स इंडिया यांनी दिली आहे.

यावेळी सविस्तर माहिती देताना म्हणतात की, फलटण शहरातील “कचरा व्यवस्थापन व पर्यावरण” याविषयी निगडित शाश्वत पद्धतीने चालना देण्याच्या उद्देशाने या उत्सवात अनेक उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.”इंटरनॅशनल झिरो वेस्ट मंथ” एक वार्षिक जागतिक उपक्रम आहे. जो शून्य कचरा प्रणालीची अंमलबजावणी अयोग्य पर्याय आणि प्लास्टिक प्रदूषणाला संबंधित करण्यासाठी प्रभावी प्रयत्नावर प्रकाश टाकतो तसेच यावर्षीची थीम “चूज रियूज अ पाथ-वे फॉर जस्ट झिरो वेस्ट फ्युचर” या अनुषंगाने आमचा पुढाकार “नाविन्यपूर्ण कचरा शून्य कचरा” सादर करण्यावर आणि जागरूकता निर्माण करण्यावर केंद्रित असल्याची माहिती देऊन पुढे म्हणतात की, या उत्सवाची सुरुवात ३१डिसेंबर रोजी झाली असून फलटणमधील वन उद्यानामध्ये संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने “लोकगीत, पारंपारिक वाद्य, गिटार इत्यादी विषयावर पर्यावरण “शून्य कचरा, प्लास्टिक बंदी, स्वच्छता कंपोस्टिंग व बालगीते इत्यादी सादर करण्यात आली फलटण मध्ये “शून्य कचरा ही मोहीम” साजरा करण्यासाठी अनेक संस्थांनी सक्रिय सहभाग दिला असल्याची माहिती ही शेवटी कमिस इंडिया यांनी दिली आहे.
Back to top button
कॉपी करू नका.