ताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

फलटण प्रतिनीधी – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार दि २ ऑगष्ट रोजी मुंबईतील त्यांच्या वर्षा निवासस्थानी इतिहासात प्रथमच संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यास महाराष्ट्रासह पंजाब, गुजरात व राजस्थान राज्यातील नामदेव भक्त उपस्थित होते .
पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना यांच्या सह महाराष्ट्र राज्यातील विविध नामदेव शिंपी समाज संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करावा असे निवेदन दिले होते. याची दखल घेत इतिहासात प्रथमच शासकीयस्तरावर संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा बंगल्यावर साजरा करण्यात आला .
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले , संतांनी शांती , समता व बंधुता याचा विश्वाला संदेश देत भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करीत सामाजीक ऐक्याचे काम केले . संत नामदेवांचे कार्य महान आहे . त्यांनी भक्ती , प्रेमाच्या जोरावर पंजाब प्रांतात काम केले . पंजाब येथे बांधण्यात येत असलेल्या संत नामदेव महाराष्ट्र भवन साठी आपण योग्य ते सहकार्य करु .
या कार्यक्रमास पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , कार्याध्यक्ष राजेंद्र मारणे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, खजिनदार मनोज मांढरे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले,  श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) च्या श्री नामदेव दरबार कमेटीचे सरबजीत सिंह बावा,  सुखजिंदर सिंह बावा, मनजींदर सिंह बावा,  नरेंदर सिंह बावा, नासपचे अध्यक्ष संजय नेवासकर, सचिव डॉ अजय फुटाणे, रोहित येवतकर, ॲड सागर मांढरे, राजस्थान नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष जसराज सोलंकी, राजेशकुमार गेहेलोत, इंदरमल चौहान, वारकरी समाज संघटनेचे राजाभाउ थोरात, गुजरात छिपा समाज संघटनेचे विजय परमार, हिराचंद नानीवाल यांच्यासह शिंपी समाज बांधव उपस्थित होते .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.