फलटण प्रतिनिधी- कोलकत्ता येथील आर.जी. कार मेडिकल कॉलेजमधील स्त्री निवासी डॉक्टरवर झालेल्या क्रूर गुन्हेगारी आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर उधळलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर फलटण डॉक्टर्स असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने आज फलटण तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना एक निवेदन देण्यात आले.

यावेळी फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ रवींद्र बिचुकले, डॉक्टर संजय राऊत, डॉक्टर जनार्दन पिसाळ, डॉक्टर विक्रांत रसाळ,डॉक्टर अशोक नाळे, डॉक्टर वैभवी कुलकर्णी, डॉक्टर संतोष गांधी, डॉक्टर सागर माने व डॉक्टर गुंदेच्या यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
या दिलेल्या निवेदनामध्ये म्हंटले आहे की, अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी नवीन कडक कायदा तयार करावा व सर्व डॉक्टरांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे अशी शासनाकडे मागणी करीत आहोत पुन्हा अशा घटना डॉक्टरच्या बाबतीत घडू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना शासन पातळीवर तयार कराव्यात व डॉक्टरांना योग्य तो न्याय मिळावा व झालेल्या घटनेचा तीव्र निषेध या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. या भावना आपल्या मार्फत शासनाला कळविण्यात याव्यात अशी मागणी हि या निवेदनात करण्यात आली आहे.
Back to top button
कॉपी करू नका.