फलटण प्रतिनिधी- सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट -२००५ च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आयएसओ मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रा.लि. आणि लायन्स क्लब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब हॉल, माळजाई मंदिर शेजारी,फलटण येथे दिनांक २१ ऑगस्ट २०२४ ते २३ऑगस्ट २०२४ पर्यंत सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळला असल्याची माहिती फलटणचे अध्यक्ष लायन जगदीश करवा यांनी दिली आहे.
यावेळी माहिती देताना म्हणाले करवा म्हणाले की,
या भरतीस बेरोजगार युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून ३२ युवकांची नोकरीसाठी निवड झाली .त्यांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आली असुन .
ही भरती प्रक्रिया २३ -ऑगस्ट २०२४ पर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत लायन्स क्लब हॉल, माळजाई मंदिर शेजारी . फलटण येथे सुरू राहणार आहे. तरी या भरतीचा जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन, मा.श्री.जगदीश करवा,अध्यक्ष, लायन्स क्लब फलटण. आणि भरती अधिकारी चंद्रशेखर सिंग, महेश सरतापे यांनी केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.