सांगली (क्री. प्र.) : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने सांगली येथे सुरु असलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात साखळी सामन्यात पुरुष गटात मुंबई उपनगर, मुंबई शहर, किशोर गटात पुणे, किशोरी गटात धाराशिव, यजमान सांगली यांनी साखळी सामन्यात विजयी वाटचाल सुरु ठेवली आहे. कुपवाड येथील अकूज ड्रीमलेंड (ता. मिरज जि. सांगली) येथे सुरु असलेले सामने 8 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत.

सकाळच्या सत्रातील सामन्यात पुरुष गटात मुंबई उपनगरने नागपूरचा ४.२० मि. राखून १ गुणाने (10-9) सहज पराभव केला. विजयी संघातर्फे अंकित चांदेकर (2.50, 1.50 मि. संरक्षण व 1 गुण), ऋषिकेश मुरचावडे (1.50, 2.10 मि. संरक्षण व 1 गुण ), निखिल सोडये (2.10, 2.10 मि. संरक्षण व 1 गुण ) यांनी चांगला खेळ केला. पराभूत संघाकडून प्रशांत पंधेरे (2.20 मि. संरक्षण), निकेश (1.10, 1.50 संरक्षण व 1 गुण) यांनी चांगला खेळ केला.

दुसऱ्या सामन्यात पुरुष गटात मुंबई ने नाशिकचा 1 गुणाने (16-15) पराभव केला. मुंबईतर्फे शुभम शिंदे (2.00, 3.00 मि. संरक्षण व 1 गुण ), प्रतीक घाणेकर (2, 1 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी चांगला खेळ केल. नाशिककडून यशवंत वाघमारे (2, 1 मि. संरक्षण व 1 गुण ) याने विज्यासाठी प्रयत्न केले.

किशोर गटात पुण्याने नागपूरचा (13-9) 1 डाव 4 गुणांनी पराभव केला. पुण्याकडून सुशांत कोळी (3 मि. संरक्षण व 2 गुण ), आर्यन हलमे (1.40 मि. संरक्षण व 2 गुण ), साहिल वडरिळे (1.40 मि. संरक्षण व 1 गुण ) यांनी चांगला खेळ केला. नागपूरतर्फे ललित सोनुले (2.10 मि. संरक्षण), अंश भगत (3 गुण ) यांनी चांगला खेळ केला .
किशोरी गटात यजमान सांगलीने आक्रमक खेळ करत नागपूरवर (12-9) एक डाव 3 गुणांनी मात केली. श्रावणी तामखेडे (3.30 मि. संरक्षण व 2 गुण ), वेदिका तामखेडे (2 मि. संरक्षण व 1 गुण), वैष्णवी चाफे (1.30 मि. संरक्षण व 4 गुण ) यांनी चांगला खेळ केला. नागपूरकडून विशाखा शेंद्रे (1 मि. संरक्षण व 3 गुण ) चांगला खेळ केला.
दुसऱ्या सामन्यात धाराशिवने ठाण्याचा चूरशीच्या सामन्यात (13-12) 1 गुणाने मात केली. यामध्ये धाराशिवतर्फे मैथिली पवार (2.10, 2.20 मि. संरक्षण व 4 गुण ), सिद्धी भोसले (1 मि. संरक्षण व 2 गुण ), अरना शेख (1.50 मि. संरक्षण व 1 गुण ) यांनी विजयात महत्वाची कामगिरी केली. ठाण्याकडून प्रणिती जगदाळे (1, 1.80 मि. संरक्षण व 3 गुण), पठाण फैजान (1.10 संरक्षण व 5 गुण) यांनी चांगला खेळ केला.
महिला गटात नाशिकने ठाण्याचा (10-9) 1 गुणाने पराभव केला.
Back to top button
कॉपी करू नका.