ताज्या घडामोडी

सौ.अस्मिता निंबाळकर यांची सातारा जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती अशासकीय सदस्यपदी निवड

फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते स्व बी.के.भाऊ निंबाळकर यांच्या सुन व सातारा जिल्हा आदर्श महिला सरपंच पुरस्कार प्राप्त व विंचुर्णी विविध कार्यकारी सोसायटी संचालक. विंचुर्णी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच, भाजपचे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर याच्या पत्नी सौ. अस्मिता सुशांत निंबाळकर सातारा जिल्हा समन्वयक व सनियंत्रण समिती दिशा समीतीच्या अशासकीय सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या ग्रामीण व राज्य सरकारच्या सर्व योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी
जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण दिशा समितीवर निवड झाल्याबद्दल सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल खासदार उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले, पालक मंत्री मा ना शंभुराजे देसाई पालकमंञी सातारा. मा ना जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंञी. मा ना मकरंद आबा पाटील पुनर्वसन मंञी महाराष्ट्र. मा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर. मा खासदार नितीन काका पाटील. आमदार सचिन पाटील.भाजप नेते सुनील तात्या काटकर. फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा समशेरसिंह ना निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य ॲड जिजामाला ना निंबाळकर . सौ चिञलेखाताई माने कदम. भरत नाना पाटील. अविनाश फरांदे. सनदी अधिकारी विश्वासराव भोसले.जिल्हा बॅंकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, प्रल्हाद तात्या साळुंखे पाटीला, माणिकराव सोनवलकर,अभिजीत भैया ना निंबाळकर . विलासराव नलवडे, फलटणचे मा नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले,मा ना महेश शिंदे साहेब. मा आ मनोजदादा घोरपडे, आ. अतुलबाबा भोसल
भाजपा शिवसेना राष्ट्रवादीत च्या सर्व नेतेमंडळी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

सौ. अस्मिता सुशांत निंबाळकर या गेली पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायत विंचुर्णी सरपंच व सदस्य म्हणुन कार्यरत आहेत विंचुर्णी गावास सशासनाचे आतापर्यंत 15 पुरस्कार प्राप्त करून त्याचा मोलाचा वाटा आहे. तसेच कृषीरत्न बि.के.भाऊ निंबाळकर पुरक संस्था व श्री समर्थ हरिबापुंमहाराज अध्यात्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट या संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत तसेच महिला बचत गट स्थापन करून महीलाना गृहिणी उद्योग साठी प्रयत्नशील आहेत अशा अनेक प्रश्नांवर त्या संदर्भात कार्यरत आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.