फलटण प्रतिनिधी- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव तसेच महात्मा फुले यांना जनतेने बहाल केलेल्या महात्मा पदवी प्रधान समारंभाचे १३७ व्या दिनाचे औचित्य साधून सुजन फाउंडेशन व महात्मा फुले अभियान यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी कांतीलाल भोसले यांना “महात्मा फुले गौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.

कांतीलाल भोसले हे जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कामगिरी करत असताना त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आपली सेवा बजावून गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली असल्यामुळे त्यांना यापूर्वी “फलटण तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार” व जिल्हा परिषद यांच्या वतीने “जिल्हा आदर्श शिक्षक विस्तार अधिकारी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कांतीलाल भोसले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून
अभिनंदन होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.