फलटण प्रतिनिधी-सातारा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता बापू अनपट यांचीसातारा जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा समिती) च्या सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार दीपक राव चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या शिफारशीनुसार दिशा समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली असून दिशा समितीचे अध्यक्ष खासदार छत्रपती उदयनराजे भोसले सहअध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सदस्य खा. नितीन काका पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा सदस्य दिशा समिती व सचिव म्हणून जिल्हाधिकारी हे काम पाहणार आहेत.
केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे कमिटीचे प्रमुख कामे आहेत. मुख्यता जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा कामे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, शिक्षण, आरोग्य व विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ही समिती काम करणार आहे.
त्यांच्या निवडीचे सर्व स्थरातून अभिनंदन होत असून जि. प.सदस्य म्हणून काम करीत असताना त्यांनी आपल्या विकास कामाचा आवळा वेगळा ठसा उमटविला आहे. विकास कामांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी कमिटी असून त्यांच्या निवडीबद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार दीपक राव चव्हाण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.