फलटण प्रतिनिधी-निरगुडी तालुका फलटण येथील निलेश हिंदुराव सस्ते यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेतून राज्यकर विभागात सहाय्यक विक्रीकर आयुक्तपदी निवड झाली आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये निलेश याचे शिक्षण झाले असून प्राथमिक शिक्षण निरगुडी येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल फलटण आणि उच्च माध्यमिक शिक्षक मधील शेती महाविद्यालय फलटण येथे तर पुणे येथील सिंहगड कॉलेज येते बीएससी बायोटेक येथून त्यांनी पदवी परीक्षा पास केली आहे.
निलेशचे वडील हिंदुराव सस्ते हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ फलटण आगारात कंडक्टर म्हणून सेवा करून निवृत्त झाले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत
हिंदुराव सस्ते यांनी चिरंजीव निलेश यांला शिक्षण दिले आहे.
हिंदुराव सस्ते यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क केला असता ते म्हणाले की, निलेशने माझ्या कष्टाचे चीज केले असून आज मला निलेशच्या निवडीचा खूप खूप आनंद झाला असून त्याचा मला सार्थ अभिमान असल्याचेही हिंदुराव सस्ते यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलून दाखविले आहे. निलेशच्या या निवडीबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.