फलटण प्रतिनिधी- सांगली येथे झालेल्या विभागीय स्तरावरील 14 वर्षाखालील क्रिकेट सामन्यामधून फलटण येथील चि. इंद्रजीत मयूर गुंजवटे याची 14 वर्षाखालील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शंकराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज शंकर नगर, अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 4 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहेत.
त्याच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक इत्यादी मान्यवरांनी इंद्रजीत गुंजवटे याचे अभिनंदन केले आहे.
त्याच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून इंद्रजीत याचे अभिनंदन होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.