फलटण: आस्था टाईम्स वृत्तसेवा-हर घर तिरंगा 2025 उपक्रमांतर्गत फलटण नगरपरिषद फलटण तहसील कार्यालय फलटण पंचायत समिती फलटण व फलटण मधील सर्व शासकीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील तसेच शाळेमधील सर्व कर्मचारी मुख्याध्यापक उपशिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या तिरंगा रॅली नंतर तिरंगा प्रतिज्ञा हा कार्यक्रम शासन निर्देशानुसार आयोजित केला असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली आहे.
मुख्याधिकारी निखिल मोरे पुढे म्हणतात की, तिरंगा रॅलीचे आयोजन मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट २९२५ रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले असून सदरच्या रॅलीचा मार्ग महात्मा फुले चौक- गजानन चौक- उमाजी नाईक चौक- महावीर स्तंभ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – छ. शिवाजी महाराज चौक असा राहणार असून सदरच्या रॅलीला फलटण शहरातील सर्व नागरिक, बंधू-भगिनी, स्वातंत्र्यसैनिक तसेच पत्रकार यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही निखिल मोरे यांनी केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.