ताज्या घडामोडी
साताऱ्याचा सुप्रसिध्द मावा केक फलटणमध्ये : देवत्व बेकर्सचा स्वातंत्र्यदिनी शुभारंभ; ‘स्वादोत्सव’साठी रामनगरी आतुरली

फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा – सातारा शहरास परजिल्ह्यात जीभेवर रेंगाळणारी मावा केकची चव आता आपल्या फलटणवासीयांचे मन जिंकणार आहे. साताऱ्यातील सुप्रसिध्द देवत्व बेकर्सच्या स्पेशल मावा केक व इतर उत्पादनांची विक्री फलटण येथील भक्ती एंटरप्रायजेसमध्ये सुरु होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी हा ‘स्वादोत्सव’ साजरा होणार असून, स्वातंत्र्य दिनाचा गोडवा मावा केक खाऊनच साजरा करायचा आहे.

मावा केक म्हंटलं की ‘देवत्व’च
मावा केक खायचा म्हंटलं तर पहिले आणि विश्वसनीय नाव पुढे येते, ते साताऱ्यातील देवत्व बेकर्सचे. देवत्व बेकर्सचा स्पेशल मावा केकने लाखो खवैय्यांना भुरळ घातली आहे. वाढदिवस असो… लग्नाचा वाढदिवस असो… कोणताही आनंदाचा उत्सव, क्षण असो… अतिथी देवा भव असो… त्यावेळी सातारकर पहिली पसंती देवत्व बेकर्सच्या मावा केकला देत असतात.

राज्यात, परदेशातही स्वाद
देवत्व बेकर्सचा शुध्द शाकाहारी मावा केक ड्रायफ्रूटने समृध्द आहे. संपूर्ण साताऱ्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आदी तसेच बंगळूरु, अहमदाबाद, सुरत, दिल्ली येथील अनेक खवैय्यांना या मावा केकची भुरळ आहे. याशिवाय, दुबई, कॅनडा, जर्मनी या देशातील भारतीयांनीही मावा केकचा स्वाद घेत आनंद व्यक्त केला आहे.




