फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – दिवसेंदिवस महाराष्ट्र लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. या वाढत चाललेल्या फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा निवृत्त आय.ए.एस. अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन सहयोग फाउंडेशन फलटण व महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑगस्ट २०२५ रोजी मुधोजी क्लब, फलटण ता. फलटण जि. सातारा येथे ११.३० वा. करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अध्यक्षस्थानी असणार असून प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता हे उपस्थित राहणार आहेत.
तरी फलटण तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनीं यांना योग्य व नेमके मार्गदर्शन मिळत नाही. या पार्श्वभूमीवर त्यांना योग्य ते प्रॉपर मार्गदर्शन मिळावे यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.