फलटण- आस्था टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या १४ वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी फलटण एज्युकेशन सोसायटी आणि क्रिकेट अकादमी ऑफ चॅम्पियन्सचे खेळाडू चि.राजप्रीत निकम, चि.शिवतेज भोंगळे आणि चि.अर्णव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. 
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी फलटणच्या या खेळाडूंची निवड पहिल्यांदाच झाली आहे.

या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण मुधोजी हायस्कूल व जुनियर कॉलेजचे प्राचार्य व सर्व क्रीडा शिक्षक इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
क्रिकेट कोच अशोक गाडगीळ यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले
Back to top button
कॉपी करू नका.