ताज्या घडामोडी

भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून पोलिओ निर्मूलन करण्याचे काम सर्वप्रथम “रोटरी क्लबच्या’ माध्यमातून झाले – श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर

फलटण तालुका "रोटरी क्लबच्या' अध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे तर उपाध्यक्षपदी डॉ. महेश बर्वे

फलटण –  आस्था टाईम्स वृत्तसेवा- फलटण तालुका रोटरी क्लब आपल्या सर्वांच्या माध्यमातून भविष्यात निश्चितच चांगले काम उभा करेल यापूर्वी फलटणमध्ये दोन वेळा रोटरी क्लब स्थापन झाला मात्र तो चालला नाही. यावेळी मात्र तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून न थांबता रोटरी क्लब अविरतपणे काम करेल खरंतर रोटरी क्लबचे काम खूप मोठे आहे
पल्स पोलिओ हा कार्यक्रम हा रोटरी क्लब ने केवळ भारतापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण जगामध्ये राबविला होता पण बऱ्याच जणांना ही मोहीम रोटरी क्लबने राबवली होती हे माहीत नाही. भारतामधील पल्स पोलिओचं निर्मूलन करण्याचे काम खऱ्या अर्थाने रोटरी क्लबच्या माध्यमातून झाले आहे असे प्रतिपादन फलटण तालुका रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण तालुका रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्षपदी डॉक्टर महेश बर्वे, सचिवपदी विक्रम निंबाळकर, खजिनदार धर्मेंद्र भल्ला, फाउंडेशन चेअर नवनाथ रणवरे, मेंबरशिप चेअर अभिजीत मोहिते इत्यादी पदाधिकाऱ्यांची निवड झाली त्यांच्या चार्टर प्रदान व पदग्रहण समारंभ कार्यक्रमांमध्ये श्रीमंत संजीवराजे बोलत होते.


याप्रसंगी माजी प्रांतपाल रोटरीन डॉ. सुरेश साबू साहेब, सहाय्यक प्रांतपाल नरेंद्र शेलार, रोटरीयन अमित वैद्य, रोटरीयन प्रवीण चांदवडकर, पवन सूर्यवंशी, डॉ. विजयकुमार देशमुख, दयाराम सूर्यवंशी, विश्वनाथ शानबाग, अमरसिंह पाटणकर, जयवंत भिलारे, अशोक पाटील, इस्माईल पटेल, सत्वशील शेळके, राजीव रावळ,व सलीम मुजावर, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे फलटण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भैया भोसले सातारा जिल्हा ॲम्युचर खो- खो असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार, माजी प्राचार्य सुधीर इंगळे, विजयराव नेवसे, अमर पिसाळ, निखिल डोंबे, राजू निंबाळकर रणजीत नाईक निंबाळकर अमरसिंह ना. निंबाळकर किशोरसिंह ना. निंबाळकर इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे श्रीमंत संजीवराजे म्हणाल की, ज्या ठिकाणी अडचण असेल महापूर आला असेल, भूकंप झाला असेल, अतिवृष्टी झाली असेल त्या ठिकाणी रोटरी क्लब जाऊन मदतीचा हात देत असते त्यामुळे रोटरी क्लबच्या माध्यमातून एक आगळीवेगळी ऊर्जा आपणाला मिळत असते. यापूर्वीही फलटण तालुक्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून आप्पासाहेब चाफळकरांच्या यांनी तरडगाव भागामध्ये उपसा जलसिंचन योजना राबविल्या होत्या. त्यावेळी खूप मोठे काम चाफळकर यांच्या माध्यमातून उभे राहिले रोटरी क्लब मध्ये काम करीत असताना आपण सर्वजण चांगले काम उभा करू तसेच काही योजना फलटण तालुक्यात तील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत व महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम करू असे सांगून पुढे श्रीमंत संजीवराजे म्हणतात हे काम करीत असताना जुन्या लोकांचे सहकार्य मिळत राहील व त्यांच्या माध्यमातूनच रोटरी क्लब पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील मी अध्यक्षपद जरी स्वीकारला असलं

तरी रोटरी क्लबच्या पाया मी निश्चितपणे मजबूत करून देईल मात्र यापुढे ची जबाबदारी ही तरुण मंडळींना घ्यावी लागेल त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू आणि अतिशय चांगलं काम रोटरी क्लबच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये करून दाखवू शेवटी सर्वसामान्य जनतेसाठी काम करणे महत्त्वाचा आहे आपणाला काय मिळते याच्यापेक्षा चांगलं काम आपण करूयात तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने आपण सर्वजण मोठे काम करीत आहोतच रोटरी क्लब मध्ये अनेक चांगली लोक आली आहेत यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य सेवेत काम करणारे डॉक्टर मंडळी सुद्धा आलेले आहेत या सर्वांच्या माध्यमातून पुढची वाटचाल करूयात असेही शेवटी श्रीमंत संजीवराजे म्हणाले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.