फलटण प्रतिनिधी- 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त हणमंतराव पवार माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष जगदीश लायन जगदीश करवा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

यावेळी फलटण नगरपालिकेची माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, फलटण नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ मधुबाला दिलीपसिंह भोसले, संस्थेचे पदाधिकारी तुषारभाई गांधी, राजाभाऊ फणसे, तेजसिंह भोसले, मुधोजी लायन्स आय हॉस्पिटलचे चेअरमन लायन अर्जुन घाडगे, लायन सुहास निकम, इत्यादी मान्यंवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. सदगुरु हरिबाबा महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी ध्वजारोहणासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
ध्वजारोहणानंतर विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना विविध मान्यवरांच्या शुभहस्ते खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात हणमंतराव पवार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी विद्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली.
कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह असंख्य पालक उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.