ताज्या घडामोडी

तरडफ ता. फलटण येथे विहिरीत पडलेल्या रान गव्याला मिळाले जीवदान

फलटण प्रतिनिधी – तरडफ ता. फलटण, जि. सातारा येथे नर जातीचा रान गवा (Indian Gaur) हा वन्य प्राणी विहिरीमध्ये पडलेल्या अवस्थेत आढळून आला की, ज्याचे वजन अंदाजे १ टन इतके होते.

हे तरडफ मधील काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. यावेळी तेथील ग्रामस्थांनी वनखात्याशी संपर्क साधला असता यावेळी वन विभाग, फलटण यांच्या सोबत “नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी” फलटण,व “रेस्क्यु बारामती” या संस्थां तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या वन्यप्राण्याला विहिरीमधुन सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले.

व वनखात्यातील वैद्यकीय अधिकारी व फलटण वनविभागातील अधिकाऱ्यांच्या निरीक्षणामध्ये रानगव्याची तपासणी करून मुक्त करण्यात आले.


याप्रसंगी नागरिकांना आवाहन करण्यात आले की, अश्या प्रकारचे वन्यजीव जखमी किंवा विहिरीमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळल्यास त्वरित वनविभाग किंवा संस्थेशी संपर्क साधावा
संपर्क क्र:
02166226979
7588532023

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.