ताज्या घडामोडी
फलटण तालुका क्रेडाई पदाधिकारी पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न
अध्यक्षपदी युवराज निकम तर सचिवपदी सुहास निंबाळकर यांची निवड

फलटण प्रतिनिधी – फलटण तालुका क्रेडाई पदाधिकारी यांचा नुकताच पदग्रहण समारंभ संपन्न झाला यामध्ये फलटण तालुका क्रेडाई अध्यक्षपदी युवराज निकम तर सचिवपदी सुहास निंबाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्रीराम टॉवर येथील संस्थेच्या कार्यालयात हा समारंभ पार पडला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाई महराष्ट्राचे अध्यक्ष श्री. प्रफुल्लजी तावरे आणी क्रेडाई महाराष्ट्र खजिनदार श्री. सुरेंद्रजी भोईटे उपस्थित होते. हा पदग्रहण सोहळा म्हणजे क्रेडाई परिवारासाठी एक पुढच्या दिशेने टाकलेलं नवीन पाऊल असते.





