ताज्या घडामोडी
तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी फलटणमध्ये तेल्या भुत्याचा कावडीचे केले स्वागत

फलटण प्रतिनिधी- शिखर शिंगणापूर श्री शंभू महादेवाच्या चैत्र वारीत कावडीची परंपरा आहे. राज्यातील अनेक भागांतून भाविक कावडी खांद्यावर घेऊन पायी चालत येतात. चैत्र शुद्ध अष्टमीला हे लोक कावडी घेऊन पोहोचतात. आपल्या भागातील पवित्र नद्यांचे पाणी दोन रांजणामध्ये भरून आणलं जातं. त्या पाण्याचा अभिषेक देवावर केला जातो आणि यावर्षी चांगला पाऊस येऊ दे अशी साद घातली जाते. विशेष म्हणजे तेल्या भुतोजी कावडीला या ठिकाणी विशेष मान दिला जातो ती कावड आज फलटणमध्ये आली असता फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने या कावडीचे स्वागत केले.



