फलटण प्रतिनिधी- आयंबील तप पारणे फलटण संघाच्या एकी, एकवाक्यता, एक विचाराचे, धर्म भावनेचे अप्रतिम दर्शन शाश्वत आयंबील तपाच्या माध्यमातून फलटण संघाने जैन समाजासमोर ठेवले आहे.
ज्येष्ठांचे मार्गदर्शन संघातील ज्येष्ठ श्राविका सोना – मोती परिवारातील श्रीमती कुसुमबेन मेहता तथा काकी आणि श्रीमती शीलाबेन मेहता तथा शीलाकाकी (पिंपोडकर) यांचे मार्गदर्शन संघाला सतत प्रेरणा देत आहे.
आयंबील तपाचे महात्म्य दु:ख, दारिद्र्य, दुर्दैव दूर करणारे तप म्हणजे आयंबिल तप, आयंबिल म्हणजे चविष्ट अन्नावर नियंत्रण ठेवण्याचा आणि आसक्ती कमी करण्याचा अचूक उपाय. कोणतेही शुभ कार्य सुरु करताना आयंबिल करणे हे अत्यंत मंगलकारक मानले जाते.
कठीण कर्मांचा क्षय करण्याचा रामबाण उपाय आयंबिल, आयंबिलद्वारे अशुभ कर्मे लवकर नष्ट होतात, आयंबिल मुळे पुण्याचा उदय लवकर होतो, आयंबिल मुळे दु:ख दूर होते आणि आयंबिल मुळे सुख प्राप्त होते. आयंबिलची ओळी करणे हे श्रेष्ठ तपांपैकी एक तप आहे. ओळीमध्ये किमान ३ आयंबिल करावेत, ज्यामुळे विघ्ने दूर होतात आणि मन:शांती प्राप्त होते.
श्री योगेशभई शहा, कराड (कामलवाडी परिवार) यांनी एका कुटुंबाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयंबील ओळीची जबाबदारी स्वीकारणे आणि ती यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे हे पहिलेच उदाहरण असून सोना – मोती परिवाराच्या धर्मभवनेला संघाने दिलेला पाठिंबा कौतुकास्पद असल्याचे आवर्जून सांगितले.
सोना – मोती परिवाराने पेलले धनुष्य जैन श्र्वेतांबर मूर्तिपूजक संघ, फलटणच्या माध्यमातून सोना – मोती परिवाराने हे धनुष्य अत्यंत उत्तम प्रकारे पेलले, त्यामुळेच संघातील सर्व श्रावक/श्राविका यांना आयंबील तपाचे पुण्य कर्म लाभले.
शहा परिवार सांगवीकर घेणार पुढच्यावर्षीची जबाबदारी बाबुलाल रामचंद शहा सांगवीकर परिवाराच्या वतीने श्री संतोषभई शहा यांनी पुढच्यावर्षी संपूर्ण संघाला आयंबील ओळी घडविण्याचा निर्धार करीत, आयंबील पारणे प्रसंगी संघाला निमंत्रण दिले आहे.
हेमंतकुमार शहा यांची उपस्थिती प्रेरणादायी फलटण शहर पोलिस ठाणे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी आज आयंबील पारणे प्रसंगी उपस्थित राहुन सर्व तपस्वी आणि संघ छोटा असूनही संघाने जपलेली एकीची भावना, धर्मभावना वाढीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
संघाच्यावतीने तपस्वी व सोना – मोती परिवाराचा बहुमान सर्व तपस्वी आणि गेले ९ दिवस सर्व तपस्वी यांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असलेले श्रावक/श्राविका आणि श्री शांतीनाथ जैन श्र्वेतांबर मूर्तिपूजक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा सोना – मोती परिवाराचे प्रमुख श्री दिपकभई मेहता आणि सोना – मोती परिवाराचे प्रतिनिधी म्हणून श्री सुजित तथा शीतलभई मेहता व सौ. डिंपलबेन मेहता या दाम्पत्याचा संघाच्यावतीने यथोचित बहुमान करण्यात आला. श्री दिपकभई मेहता यांना दिलेल्या सन्मान पत्राचे वाचन कर सल्लागार ॲड. शैलेंद्रभई शहा यांनी केले, तर सौ. स्वप्नाबेन शहा यांनी सर्वांचे कौतुक केले, श्री दिपकभई मेहता यांनी समारोप व आभार मानले. – अरविंद मेहता