फलटण- आस्था टाईम्स वृत्तसेवा: महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयां मध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शिंदे व दिलीप पिसाळ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
याप्रसंगी महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, महात्मा शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. वैशाली चोरमले, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अमरसिंह खानविलकर, विरसिंह खानविलकर, सौ सुषमा काटे, भारती शिंदे, अमर पिसाळ व निखिल डोंबे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व बुके देवून सत्कार केला.
याप्रसंगी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मूकबधिर विद्यालयाने कवायत व योगासने सादर करून आपली कला दाखविली.
यावेळी विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ. हेमा गोडसे, सौ. विजया भोजने, श्रीमती निर्मला चोरमले, उदय निकम, चैतन्य खरात, नितेश शिंदे व राठोड सर इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.