ताज्या घडामोडी
७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिन राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली उत्साहात साजरा ; सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण परंपरा कायम

(जावली/ अजिंक्य आढाव)- देश भरात स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना जावली ता फलटण येथील राॅयल इंग्लिश स्कूल जावली येथे 79 वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला.

या बरोबर रोहित भगत( इंडियन आर्मी),निलेश घनवट (इंडियन आर्मी ) तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.दशरथ चवरे संस्थापक सचिव अमोल चवरे प्राचार्य सौ. कांचन चवरे मॅडम ,अमित वाघमोडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन व विकास समिती सौ.गौरी जाधव अध्यक्ष माता पालक संघ सौ.सुप्रिया मोरे अध्यक्ष सखी समिती व पालक वर्ग इत्यादी उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमातेच्या पूजनाने झाली, त्यानंतर ध्वजारोहणाचा क्षण संपूर्ण परिसरात देशभक्तीच्या भावनेने दुमदुमला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नेत्रदीपक कवायती, देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण अधिकच भारावले.हा दिवस फक्त उत्सव नव्हता, तर स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण जपण्याचा आणि भावी पिढीला प्रेरणा देण्याचा क्षण ठरला.

