फलटण – सातारा जिल्हा परिषद साताराचे जिल्हा कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके नुकतेच नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून जिल्हा कृषी अधिकारी (मग्रारोहयो)
सातारा जिल्हा परिषद या पदावरून सेवानिवृत्त झाले.
त्याच्या सेवानिवृत्तीबद्दल जिल्हा परिषद सातारा कृषी विभागामध्ये नुकताच निरोप समारंभ सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा प्र) मा.श्री.निलेश घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा.चे विश्वास सिद व शिक्षण अधिकारी, विविध मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला होता.
बापूराव शेळके यांनी सुरुवातीच्या काळात सुरवातीच्या सेवा कालावधीत राज्यात विविध ठिकाणी सावंतवाडी (सिंधुदुर्ग), अलिबाग (रायगड), कर्जत-खोपोली, उमदी, जत (सांगली), जेजुरी (पुणे) व मंडणगड (रत्नागिरी) या दुर्गम भागात यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

यावेळी निरोप समारंभाला उत्तर देताना बाबुराव शेळके म्हणाले की,
मी दि. ३१/०७/२०२५ रोजी शासकीय सेवेतुन नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालो आहे. ३१ जानेवारी १९९२ पासुन आजअखेर एकूण ३३ वर्ष ०६ महिनेचे प्रदीर्घ सेवाकालावधीत आपणा सर्वांचे सहकारी अधिकारी,कर्मचारी, आप्तेष्ट, मित्र परिवार, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी व पत्रकार बंधु यांचे सहकार्यामुळे कृषि विभागातील योजनांची अंमलबजावणी करताना बळीराजाची सेवा यशस्वीपणे करणे शक्य झाले याचा मनोमन आनंद असून सुरवातीच्या सेवा कालावधीत राज्याच्या विविध दुर्गम भागात सेवा केली तदनंतर मा.ना.जयकुमार गोरे, मंत्री, ग्रामीण विकास व पंचायत राज, व मा. ना. मकरंद (आबा) जाधव-पाटील, मंत्री, मदत व पुनर्वसन, मंत्रालय मुंबई यांनी जिल्ह्यात काम करण्याची तयारी असल्याशिवाय कोणतीही मदत करणार नाही या भूमिकेतून दोघांनी व तत्कालीन आमदार महोदयांनी केलेल्या अनमोल सहकार्यामुळे सन-२००५ पासून सातारा जिल्ह्यात कृषि अधिकारी, खंडाळा, मोहिम अधिकारी, जि. प. सातारा, तालुका कृषि अधिकारी, कोरेगाव व जिल्हा कृषि अधिकारी (मग्रारोहयो), जि. प. सातारा या विविध पदांवर १६-१७ वर्ष सेवा करुन स्व-जिल्ह्यात सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी म्हणून निवृत्त होण्याचे भाग्य लाभले याचा मला मनस्वी आनंद असल्याचे सांगून
शेळके म्हणाले कार्यकाळात सातारा जिल्ह्यात केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना DBT in Fertilizer, कोविड-१९ मधील कोरेगाव तालुक्यातील शेतमाल विक्री व्यवस्थापन, मग्रारोहयो अंतर्गत राज्य शासनाची प्रायोगिक तत्वावरील बांबु लागवड योजना, आदर्श शाळा भौतिक सुधारणा कार्यक्रम, सिंचन विहीर व मिशन जलतारा ईत्यादी विविध योजनांतर्गत वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय काम करणे शक्य झाले.
तसेच शासकिय सेवा बजावताना सुविद्य पत्नी रोहिणी हिचे योगदान देखील नाकारता येणार नाही. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दूरवर काम करत असताना मुलांचे शिक्षणाची आबाळ/गैरसोय होऊ नये याकरिता कौटुंबिक सुखाचा त्याग करुन आई-वडिलांसोबत लोणंद येथेच २५-३० वर्ष वास्तव्य केले. कौटुंबिक जबाबदारी सोबत मुलांचे शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन दोन्ही मुलांना ( निखिल- निनाद) उच्च-विद्याविभूषित केले. याचे संपूर्ण श्रेय धर्मपत्नीला जाते. दोन्ही बहिणी राजश्री चोरमले व प्रमिला धायगुडे, पितृतुल्य सासरे जगन्नाथराव माने (पैठण) तसेच मित्रस्वरुप मेहुणे बाळासाहेब धायगुडे, सचिन घरबुडे, संदीप माने, सतीश लकडे, अनंता शिंदे व मुकेश कोळेकर ईत्यादी नातेवाईकांनी वेळोवेळी दिलेल्या सामाजिक, भावनिक व कौटुंबिक आधारामुळे विविध टप्प्यावर यश संपादन करुन आंनदी व निष्कलंक सेवानिवृत्तीस पात्र होऊ शकलो.

माझ्या आयुष्यातील सर्व घटना व यशाचे श्रेय सहनशील, मितभाषी परंतु कर्तव्यनिष्ठ मातोश्री रतनबाई शेळके हिने कठीण परिस्थितीत केलेल्या अथक परिश्रमास जाते. मोलमजुरी करीत वेळप्रसंगी रोजगार हमीच्या कामावर जाऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी १५-२० वर्ष सांभाळून आम्हा तिन्ही भावंडांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्यामुळेच आज आम्ही तिन्ही भावंडे शासकीय सेवेत कार्यरत आहोत.

याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मा. अजित पवार (आप्पा), अमृतराव काळोखे (सर) व शंकरराव माने (पाडेगाव) या सर्वांच्या प्रेरणेने व सहकार्याने कॉलेज शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करता आले. कॉलेजनंतर लोणंदमध्ये एम.पी.कराडेसाहेब, दत्तात्रय कचरे, पंकज जेबले, नारायण घोलप, सुनिल हरिदास, प्रदीप हरिदास, भारत शेळके, सुनील खरात, गिरीश रावळ, सहदेव गोरड व विविध प्रसंगात वेळोवेळी सहकार्य करणारा मित्र परिवार (सर्वांचा नामोल्लेख करणे अशक्य आहे) या सर्वांचा आजअखेरच्या माझे यशामध्ये असणारा मोलाचा सहभाग नाकारता येणार नाही.
यशस्वी व निष्कलंक सेवापूर्तीबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद. आपले सहकार्य व प्रेम असेच वृद्धिंगत होवो. भविष्यात कृषि विभाग व शेतकऱ्यांच्या सेवार्थ निरंतर कार्यरत राहण्याचे भाग्य मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो असेही शेवटी बापूराव शेळके म्हणाले.
Back to top button
कॉपी करू नका.