(आस्था टाईम्स वृत्तसेवा) – फलटण पालिकेने स्तनदा मातांसाठी तात्काळ हिरकणी स्थापन करावा अशी मागणी मनसे चे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी निवेदनाद्वारे फलटण नगर परिषद चे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून सुमारे 75 वर्षे पूर्ण होऊन गेली नुकताच आपण अमृत महोत्सव साजरा केला परंतु स्त्रियांच्या वाटेला अजूनही उपेक्षाच आहेत असे वाटते.हिरकणी कक्षाची मागणी केवळ सोयीसाठी नाही, तर ती महिलांच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे.अनेक सरकारी धोरणांमध्ये याची तरतूद असूनही अद्याप आपले कार्यालयात व शहराच्या विविध ठिकाणी ही सुविधा उपलब्ध नाही.
फलटण नगरपरिषद कार्यालयात काम करणाऱ्या व काही शासकीय कामानिमित्त येणाऱ्या स्तनदा मातांना त्यांच्या लहान बाळांना दूध पाजण्यासाठी सध्या आवश्यक ती सोय उपलब्ध नाही. परिणामी अशा मातांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
फ.न.प. मुख्यालय व फलटण शहरात दररोज मोठ्या संख्येने महिला आपल्या लहान बालकांसोबत येत असतात. मात्र, त्यांच्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित हिरकणी कक्ष उपलब्ध नसल्याने त्यांना उघड्यावर, असुविधाजनक ठिकाणी किंवा सार्वजनिक टॉयलेटमध्ये बाळांना दूध पाजावे लागते. ही स्थिती आरोग्यासाठी धोकादायक तर आहेच, पण त्यातून महिलांच्या गोपनीयतेलाही बाधा पोहोचते.महिला सक्षमीकरण आणि मातृत्वाचा सन्मान राखण्यासाठी तसेच मातांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी नगरपरिषद मुख्यालय व शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणी “हिरकणी कक्ष” स्थापन करणे अत्यावश्यक झाले आहे.
हा कक्ष स्तनदा मातांसाठी सुरक्षित, स्वच्छ व खासगी जागा असेल, जिथे त्या आपली बाळे आरामात स्तनपान करू शकतील.शासनाने वारंवार निर्देशित करून सुद्धा आपले स्तरावर कार्यवाही होत नसेल तर स्त्रियांना अजूनही गैरसोयीचा सामना करावा लागतो असेच म्हणावे लागेल
तरी, आपल्या नगरपरिषद कार्यालयात आणि शहरात काही ठिकाणे आयडेंटीफाय करून तात्काळ हिरकणी कक्ष स्थापन करण्याची कार्यवाही करण्यात यावी व मातांची होणारी गैरसोय तत्काळ दूर करावीअशी मागणी युवराज शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Back to top button
कॉपी करू नका.