(जावली/अजिंक्य आढाव)- श्री संत बाळुमामा यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी वाढत आहे.यातच फलटण शहर व ग्रामीण भागातील भाविक भक्तांची गेल्या अनेक वर्षांपासून वारी सुरू आहे, यामुळे बस सेवा सुरु करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात फलटण ते आदमापूर बस सेवा सुरु करण्याची मागणी निवेदनानुसार करण्यात आली होती.हे निवेदन फलटण आगार प्रमुखांना देण्यात आले.
वाखरी गावातील तरुणांनी केले फलटण ते आदमापूर बसचे स्वागत
फलटण आगार च्या वतीने निवेदन तातडीने लक्षात घेऊन दि.१४ ऑगस्ट २०२५ रोजी बस सेवा सुरु करण्यात आली.ही बस फलटण आगरातुन दुपारी १२:३० सुटणार पुसेगाव, औंध , पुसेसावळी कराड, कोल्हापूर,आदमापुर या ठिकाणी ६:३० पोहचणार आहे.व सकाळी ७:३० आदमापुर आगारहुन सुटणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात वाढत्या भाविक भक्तांची गर्दी मुळे बस सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आली असे आगारप्रमुख यांच्या वतीने सांगण्यात आले.
बस सेवा सुरु करण्यासाठी फलटण तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या फलटण कोरेगाव विधानसभा अध्यक्ष रमेश चव्हाण,तालुका अध्यक्ष महादेव कुलाळ ,मामा लोखंडे, निलेश लांडगे, रामदास केंद्रे, नितीन सुळ आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.