ताज्या घडामोडी
१३ ते १९ जानेवारी रोजी खो-खो पहिल्या विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्पर्धेचे दिले निमंत्रण : पहिल्या विश्व वर्ल्ड कप मध्ये भारत, अमेरिका, दक्षिण-आफ्रिका, पोलंड, नेपाळ, अर्जेंटिना व पेरू इत्यादी २३ देशाचा समावेश असणार

मुंबई प्रतिनिधी – भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल व सहसचिव डॉ चंद्रजीत जाधव आज मुंबईत महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आश्रयदाते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांना पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेचे निमंत्रण देण्यासाठी मंत्रालयात आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री सचिन गोडबोले व सहसचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर, डलेश देसाई, सचिन पालकर व स्वप्निल पोळ होते.



