ताज्या घडामोडी

सातारा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी राहुल गावडे यांची नियुक्ती

फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा : सातारा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त कार्यकारी अधिकारी पदी राहुल नेमचंद गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल गावडे हे कार्यक्षम अधिकारी म्हणून सर्वांना परिचित आहेत त्यांनी आपल्या कामातून अनेक ठिकाणी कामकाज करीत असताना आगळा- वेगळा ठसा उमटविला आहे. 

राहुल गावडे यांची सर्वप्रथम सन -२०१० साली इगतपुरी येथे गट विकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली यानंतर सन -२०१२ सांगोला जिल्हा सोलापूर येथे गटविकास अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते. तर सन -२०१६ साली ते वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम करीत होते तर सन २०१८ ते सन २०२३ साली सांगली जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते.यानंतर सन -२०२३ रोजी पुणे जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम होते. तर सन -२०२४ पासून नंदुरबार येथे ते प्रकल्प संचालक म्हणून कामकाज पाहत असतानाच त्यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त कार्यकारी अधिकारी पदी  नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्ती बद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी व हितचिंतकांनी  त्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.