फलटण प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी श्री. पांडुरंगाच्या आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना दिल्या शुभेच्छा
शुभेच्छापत्रात श्रीमंत रामराजे म्हणतात की, आज देवशयनी आषाढी एकादशी, सर्व भाविकांच्या भक्तिभावनेच्या परमोच्च आनंदाचा दिवस. भगवान पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेले भाविक संपूर्ण राज्याच्या कोनाकोपऱ्यातून चंद्रभागेच्या तीरावर एकत्र येतात.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या संत संप्रदायाची शिकवण आणि मानवा-मानवांतील एकात्मतेची वीण घट्ट करणाऱ्या आषाढी एकादशीच्या सणाचे व वारीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. असे सांगून पुढे श्रीमंत रामराजे म्हणतात जात, धर्म, पंथाच्या सीमा ओलांडून सर्व समाविष्टता जपणाऱ्या वारकरी संप्रदायाची ही परंपरा अखंड सुरू राहावी. भगवान पांडुरंगाच्या चरणी लीन होऊया.
सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा.
Back to top button
कॉपी करू नका.