ताज्या घडामोडी

एस.टी. कामगार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन पदी सौ. आशाताई जगताप तर व्हॉइस चेअरमन पदी हिंदुराव करे

फलटण प्रतिनिधी- महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पुरस्कृत श्रीराम पॅनेलला सोसायटी निवडणुकीत 15/0 ने एक हाती विजय मिळवत सभासद आर्थिक दृष्ट्या बळकट होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत सोसायटीच्या चेअरमन पदी प्रथमच महिला संचालकाला चेअरमन पदी विराजमान होण्याचा बहुमान देण्यात आला. यामध्ये
सौ. आशाताई जगताप यांची चेअरमन पदी तर श्री. हिंदुराव करे यांची व्हॉईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सामान्य कामगारांची हक्काची एस टी बँक चुकीच्या आणि स्वार्थी लोकांच्या हातात दिल्यावर तिचे व सभासदांचे झालेले हाल पाहता येणाऱ्या काळात फलटण सोसायटीचे सर्व संचालक मंडळ सभासदांना आर्थिक दृष्ट्या सबळ बनवण्यासाठी व सभासदांना आर्थिक अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी सोसायटी 100% पाठीशी उभी राहील.
कामगार संघटनेचे नेतृत्व जनरल सेक्रेटरी  मा.श्री. हनुमंत ताटे साहेब, केंद्रीय अध्यक्ष मा.श्री.संदीप दादा शिंदे यांच्या विचारानुसार सभासद हित हे पहिल्यांदा विचारात घेऊनच संचालक मंडळ कामगार हिताचे निर्णय घेतील
या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय उपाध्यक्ष तथा सातारा विभागीय अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव देशमुख, सातारा विभागीय सचिव मा.श्री. अजित पिसाळ, सातारा विभागीय कार्याध्यक्ष मा.श्री.ज्ञानेश्वर घोणे नाना, विभागीय संघटक सचिव मा.श्री. सुशांत मोहिते, विभागीय खजिनदार मा.श्री.प्रकाशराव पाटील, माजी बँक संचालिका सौ.लाडू ताई मडके यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी फलटण आगार सचिव श्री.योगेश भागवत, अध्यक्ष श्री.बाळासाहेब सोनावले, उमेश निंबाळकर नवनाथ पन्हाळे राहुल जाधव दादासो माने श्री सीताराम खवळे, श्री दशरथ कदम, श्री बाळासाहेब जगताप, श्री विलास डांगे श्री सुरेश आडागळे श्री आप्पासो भोसले श्री दत्तात्रय कोळेकर श्री. विकास राऊत,श्री.बापूराव कोलवडकर श्री.निराप्पा वाघमोडे, श्री निलेश बोधे, श्री.सुरेश अडागळे, श्री देविदास निंबाळकर, श्री गणेश सावंत, श्री महेश गोसावी श्री सुरज तोडकर श्री गोरख पारखे गोवेकर मॅडम, इत्यादी सभासद उपस्थित बहुसंख्येने होते.उपस्थितांचे आभार श्री बाळासाहेब सोनवले यांनी मानले

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.