फलटण प्रतिनिधी- जायंट्स ग्रुप ऑफ सहेली व जायंट्स ग्रुप ऑफ फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विविध फनी गेम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये प्रामुख्याने संगीत खुर्ची, लिंबू चमचा, हत्तीला शेपूट लावणे व बादलीत बॉल टाकणे इ. फनी गेम्सचे आयोजन मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले होते.
याप्रसंगी जायंट्स ग्रुप फलटण सहेलीच्या अध्यक्षा मा.श्रीमंत सौ. शिवांजलीराजे ना. निंबाळकर, उपाध्यक्षा सौ. वसुंधरा ना. निंबाळकर, जायंटस ग्रुप ऑफ फलटणचे अध्यक्ष दिपक दोशी, फेड युनिट डायरेक्टर शांताराम आवटे सर, प्रभाकर भोसले सर, जायंटस ग्रुपचे माजी अध्यक्ष मोहनराव नाईक निंबाळकर, शिरीष शहा, धनाजीराव घोरपडे, धनाजीराव जाधव, विठ्ठलराव माने, हणुमंतराव घनवट, सुरेश शिंदे, शामराव निकम, व प्रदीप फडे तसेच सहेली ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सायंकाळी फनी गेम्सचा बक्षीस वितरण समारंभ जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीचे अध्यक्षा श्रीमंत शिवाजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते आकर्षक बक्षिसे देऊन करण्यात आला. याप्रसंगी जायंटस ग्रुप ऑफ फलटण व जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीचे सर्व सभासद उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.