फलटण आस्था टाईम वृत्तसेवा – पु.ना. गाडगीळ अँड सन्स, पी एम डी मिल्क अँड फूड्स व शुक्रवार पेठ तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री उत्सवानिमित्त मोफत दूध वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन २५ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ अखेर करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रितम बेंद्रे, राहुल निंबाळकर व निलेश खानविलकर यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार सचिन पाटील, तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार सोनवणे साहेब फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, कृषी संचालक जितेंद्र शिंदे, उद्योगपती हनुमंतराव मोहिते, ॲड. महेंद्र नलावडे, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांत शिंदे, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक विकास राऊत, राजेंद्र अहिरराव, फलटण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय पालकर इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव म्हणाले की, शुक्रवार पेठ तालीम मंडळाचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य व सर्वसामान्य नागरिकांना, महिला भगिनींना दिलासा देणारा असून या मंडळाचे विविध उपक्रम हे समाजपयोगी असतात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर मंडळांनी सुद्धा याचा आदर्श घ्यावा असेही शेवटी डॉ. अभिजीत जाधव म्हणाले.

यावेळी मंडळाचे पदाधिकारी माहिती देताना म्हणाले की, गेली अनेक वर्ष पासून दरवर्षी आम्ही नवरात्रीनिमित्त दुधाचे वाटप करीत असतो याच पार्श्वभूमीवर यंदाच्या ही वर्षी शुक्रवार पेठ तालीम मंडळाच्या वतीने नवरात्रीचे औचित्य साधून २५ सप्टेंबर पासून ते २९ सप्टेंबर अखेर दररोज ५०० लिटर दूधाचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
याचा लाभ परिसरातील महिला भगिनींना होत असल्याबद्दल त्या महिला भगिनी शुक्रवार पेठ तालीम मंडळाला धन्यवाद देत आहेत.
Back to top button
कॉपी करू नका.