फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा- गणेशोत्सव हा भक्ती, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा मिलाफ मानला जातो. गजराज तरुण मंडळ तेली गल्ली चा राजा या गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक जाणीव ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शनिवारी सकाळपासूनच शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिराचे उद्घाटन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी गणरायाचे आशीर्वाद घेत रक्तदानासारख्या पवित्र कार्याचे कौतुक केले. या शिबिरात युवक, व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी
संख्येने रक्तदान केले. रक्तदानासाठी वैद्यकीय पथक उपस्थित होते. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र, अल्पोपहार तसेच आभारपत्र देऊन गौरविण्यात आले.

शिबिरात एकूण ६१ पेक्षा जास्त बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. हा सहभाग पाहून आयोजक मंडळ व वैद्यकीय अधिकारी यांनी आनंद व्यक्त केला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक जाणीवेचा उत्सव म्हणून साजरा व्हावा, हा उद्देश या उपक्रमातून गजराज तरुण मंडळाने साधला आहे. व रक्तदानासारख्या कार्यातून “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” आहे. हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला असून आपल्या एका रक्ताच्या थेंबातून अनेकांची वाचले जातात याची जाणीवही करून दिली आहे.
Back to top button
कॉपी करू नका.