ताज्या घडामोडी

फलटणचा पालखीतळ अवघ्या ३ तासात स्वच्छ -मुख्याधिकारी निखिल मोरे

फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज फलटणहून बरकडे रवाना झाल्यानंतर तात्काळ फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी फलटण नगर परिषद, कोल्हापूर कागल नगर परिषद, सावित्रीबाई फुले विद्यापीठ व इतर सामाजिक संस्थांच्या मदतीने अवघ्या काही मिनिटातच पालखी तळावर स्वच्छतेला सुरुवात करून अवघ्या ३ तासात पालखीतळ स्वच्छ केला आहे.

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण शहरात आल्यानंतर फलटण येथील विमाध तळावर मुक्कामास असतो हा पालखीतळ जवळपास १०० एकरचा असून लाखो वारकरी येथे मुक्कामासाठी असतात. काल रात्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण शहरात आगमन झाले. फलटण शहरातील विमानतळावरील मुक्काम आटोपून आज सकाळी ६.३० वा. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे बरडकडे प्रस्थान होताच अवघ्या काही मिनिटातच फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सहकारी कर्मचारी तसेच विविध संस्थांच्या मदतीने पालखी तळ स्वच्छतेला सुरुवात केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे राष्ट्रीय सेवा योजना यातील डॉ प्रताप फळफळे, वंदना सोनवणे, प्राध्यापक योगिता घाटोळ, डॉ सुरेखा जाधव, डॉ मनिषा बोडके, अशोक पिलाने, अनिल केंगर यांचे सोबत १५० विद्यार्थी तसेच कागल नगरपरिषद( जिल्हा कोल्हापूर) येथील मुख्याधिकारी अजय पाटणकर व त्यांची २५ कर्मचारी यांची टीम यांनी फलटण पालखीतळ येथे स्वच्छतेची सेवा देण्याचे काम चालू केले. दुर्गंधी पसरू नये म्हणून ओडो फ्रेशची फवारणी ही केली आहे. नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा त्यांना सहकार्य करीत असल्याने अवघ्या तीन तासातच पालखीतळाची स्वच्छता झाल्याचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.