फलटण प्रतिनिधी- श्रीमंत सईबाई महाराज महिला पतसंस्था, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण व जायंटस ग्रुप ऑफ सहेली व राजे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी ठिक सायं. ५ ते ८ या वेळेत मुधोजी हायस्कूल जुनिअर कॉलेजच्या प्रांगणात फलटण तालुक्यातील महिलांसाठी हळदी कुंकू व मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या जेष्ठ सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे ना. निंबाळकर यांनी दिली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती देताना श्रीमंत सौ. शिवांजलीराजे पुढे म्हणाल्या की, सदरचा कार्यक्रम सायंकाळी ५ ते ८ या वेळेमध्ये आयोजित करण्यात आला असून महिलांच्या मनोरंजनासाठी छोटे छोटे खेळ व स्वरसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचा आनंद फलटण तालुक्यातील व शहरातील महिला भगिनींनी घ्यावा असेही आवाहन शेवटी श्रीमंत सौ.शिवांजलीराजे निंबाळकर यांनी केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.