ताज्या घडामोडी
महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रीमंत रामराजे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र आदरांजली

फलटण प्रतिनिधी- आपल्या देशाच्या संविधानाचे निर्माते तथा भारताचे थोर सुपुत्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अभिवादन केले.
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश देत त्यांनी समाजात संघर्ष करीत असलेल्या लोकांना प्रेरणा दिली. शिक्षणाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी पुढाकार घेऊन मानवाधिकारांच्या रक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या बाबासाहेबांचे विचार कृतीतून पुढे न्यावेत हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल” असेही शेवटी श्रीमंत रामराजे म्हणाले.