ताज्या घडामोडी
थोरातवाडीत नागरिकांना पाच दिवसातून एकदाच पाणी पुरवठा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणी टंचाई लोकांच्या पाचवीलाच पुजलेले

(इंदापूर/प्रतिनिधी) : इंदापूर तालुक्यातील रुई येथील थोरातवाडी मध्ये नागरिकांना उन्हाळ्याच्या तोंडावर पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे लोकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. पाच दिवसातून एकदाच पाणी सोडले जाते. त्यामुळे लोकांना पाणी टंचाईचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
काही शेतकऱ्यांचा विरोध असल्याने काम थांबले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जल जिवन योजनेचे राहिलेले काम चालू करणार आहे. – दाऊद शेख, स्थापत्य सहाय्यक (पाणी पुरवठा विभाग) पंचायत समिती इंदापूर
दर वर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
शासकीय विहीरीतील पाण्याची लाईन दोन इंची असल्याने पाणी टाकीत मध्ये कमी प्रमाणात जाते.लाखोंचा खर्च करून बसवलेले आरओ फिल्टर बंद आहेत. ग्रामपंचायत पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करते. जल जिवन योजनेचे काम दोन महिन्यांपासून बंद आहे.
आठ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करु. पाईप लाईन लिकीज काढून दुरुस्ती करण्यात येईल. जल जिवन योजनेचा आमचा काही संबंध नाही. – सोमनाथ पवार, ग्रामसेवक ग्रामपंचायत रुई.
रुई ग्रामपंचायत थोरातवाडी च्या पाणी टंचाई कडे लक्ष देत नसल्याने पाण्याचे व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून पाणी पुरवठा योजना राबविली परंतु पाणी टंचाईचा प्रश्न सुटला नाही.कोट्यवधी रुपये खर्च करून केंद्र सरकारने जल जिवन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी पाण्याचे नळ देण्याचा संकल्प केला आहे. परंतु थोरातवाडीत जल जिवन योजनेचे काम गेले दोन महिने बंद आहे. यासंदर्भात शासनाच्या अधिकार्यांना फोन केला तर फोन लागत नाही. लागला तर लवकरच काम चालू करु अशी उत्तरे दिली जातात